ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरू

तालुका ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत निर्धार

राजापूर | प्रतिनिधी : ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे असून त्याला धक्का लागू देणार नाही. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी भविष्यात रस्त्यावरही उतरू असा निर्धार राजापूर तालुका ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीमध्ये करण्यात आला. ओबीसी आरक्षणासंबंधित लढा हा भावी पिढीच्या भविष्यासाठी असल्याने या लढ्यामध्ये सर्व ओबीसी बांधवांसह जास्तीत युवावर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी जनमोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांनी यावेळी केले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील सभागृहामध्ये श्री. शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला तालुका सरचिटणीस चंद्रकांत जानस्कर, दिपक नागले, अनिल भोवड, अ‍ॅड. शशिकांत सुतार, प्रकाश मांडवकर, रविंद्र नागरेकर, अभिजीत गुरव, विद्याधर राणे, प्रकाश कुवळेकर, आबा आडीवरेकर, अनामिका जाधव, संतोष हातणकर, मनोहर गुरव, दिपक बेंद्रे, रविकांत भामत, डी.एम.चव्हाण, प्रकाश झोरे, विनोद शेलार, विलास हर्याण, जितेंद्र पाटकर, श्रीकांत राघव, भास्कर कुवळेकर, महेश मणचेकर, नरेश दुधवडकर, अरविंद लांजेकर, उमेश पराडकर, प्रकाश लोळगे, सुभाष नवाळे, शुभांगी सोलगावकर, शितल पटेल यांच्यासह मोठ्यासंख्येने ओबीसीमधील विविध संघटनांचे पदाधिकारी, ओबीसी बांधव उपस्थित होते.

याप्रसंगी शिवलकर यांसह मारूती खेडस्कर, एड. शशिकांत सुतार, अनिल भोवड सुरेश बाईत, मधुकर तोरस्कर, शुभांगी सोलगावकर, मनोहर गुरव, संतोष हातणकर, संतोष तांबे, प्रकाश झोरे, बलवंत सुतार, डी.एम.चव्हाण आदींनी ओबीसी संघटन आणि ओबीसी आरक्षण वाचविण्याचा लढा यासंबंधित मार्गदर्शन केले.याप्रसंगी मोठया संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.