परब को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा २८ सप्टेंबर रोजी!

मसुरे | झुंजार पेडणेकर : परब को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मुंबई या पतसंस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. बालविकास व्यायाम मंदिर हॉल, गौरीशंकरवाडी नं. २, बि. नं. ५७ च्या बाजूला पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई – ०७५ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेस सर्व भाग धारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी मंडळातर्फे अध्यक्ष डॉ दीपक परब यांनी यांनी केले आहे.