सुवर्णं 6 रौप्य 4 कास्य 5 , 15पदकांची कमाई
मोहन नाईक, श्रेया देसाई यांना सुवर्णं पदके
दोडामार्ग l प्रतिनिधी :पेडणे येथील पेढेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या ४ थ्या IJKAI (आय. जे. के.ए. आय) गोवा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत करुणा सदन स्कूल साटेली भेडशी च्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट करून शाळेला बहुमान मिळवून दिला आहे त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

करुणा सदन स्कुलच्या वतीने या स्पर्धेत मोहन नाईक आणि श्रेया देसाई यांनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारांत सुवर्ण पदक पटकावले. श्लोक सावंत आणि एम. देवदेत मनोज यांनी प्रत्येकी काता मध्ये कांस्य व कुमिते मध्ये सुवर्ण पदक मिळवले. तर अन्वेष देसाईने काता व कुमिते या दोन्ही प्रकारांत रौप्य पदक जिंकले. सान्वी नाईक हिने काता मध्ये रौप्य व कुमिते मध्ये कांस्य पदक मिळवले. अमय बेलणकी याने कुमिते मध्ये रौप्य पदक मिळवले. तसेच कैवल्य देसाईने काता मध्ये कांस्य व पार्थ दळवी याने कुमिते मध्ये कांस्य पदक मिळवले.
या स्पर्धेत करुणा सदन स्कूलने मिळवलेल्या पदकांचा एकूण 15 पदक मिळविली यात सुवर्ण ६, रौप्य ४ आणि कांस्य ५ समावेश आहे
प्रशालेचे कराटे प्रशिक्षक बाळकृष्ण कर्पे यांनी खेळाडूंच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच करुणा सदन स्कूलच्या प्राचार्या सिस्टर सबीना यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षक श्री कर्पे आदींचे अभिनंदन केले.त्याच्या यशाबद्दल तालुक्यातून कौतुक होत आहे












