आचरा-अर्जुन बापर्डेकर :वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा तर्फे देण्यात येणारा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ हा ;पणदूर येथील ‘संविता आश्रम’ तसेच मुंबई,पालघर,गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा व आधार देण्याचे महान कार्य करणा-या थोर समाजसेवक .संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांना जाहिर झाला आहे.याबाबतची माहिती संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी जाहिर केला. .आचरे गावचे सुपुत्र आणि पतसंस्थेचे संस्थापक आणि माजी चेअरमन कै श्रीकांत सांबारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो.सदर पुरस्कार २४ सप्टेंबर रोजी होणा-या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात येणार आहे.
Home ताज्या घडामोडी “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ सविता आश्रमचे संदिप परब यांना जाहीर












