दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे भजनांचा जंगी सामना

गावखडी / वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ, साळवी नगर येथे यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • २६ सप्टेंबर: रात्री १०:३० वाजता बुवा संदीप लोके आणि बुवा गुंडू सावंत यांच्यात भजनांचा २० × २० जंगी सामना होईल.
  • २७ सप्टेंबर: सायंकाळी ५:३० वाजता गोंधळ आणि जोगवा मागण्याचा कार्यक्रम, तर रात्री ७:३० वाजता दिवटी नाचण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता गोंधळाची कथा सादर केली जाईल.
  • २८ सप्टेंबर: सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा होईल. रात्री ९:३० वाजता दांडिया रासचा कार्यक्रम आहे.
  • २९ सप्टेंबर: सायंकाळी ४:३० वाजता पाककला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी संपर्क: केतन झगडे (मो. ९४२१७०७५८९). रात्री ९:३० वाजता पुन्हा दांडिया रास होईल.
  • ३० सप्टेंबर: सकाळी १० वाजता होम-हवन आणि कुमारी पूजन होणार आहे. रात्री १० वाजता ५ ते २० वयोगटातील मुलांसाठी डान्स स्पर्धा होईल, त्यानंतर रात्री ११ वाजता दांडिया रासचा कार्यक्रम आहे.
  • १ ऑक्टोबर: दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल. रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ, त्यानंतर रात्री ११ वाजता रायगडचे शाहीर योगेश जाधव आणि तेजल पवार यांच्यात शक्ती तुऱ्यांचा जंगी सामना होईल.
  • २ ऑक्टोबर: सायंकाळी ५:३० वाजता दसऱ्यानिमित्त मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी ७ वाजता आरती आणि रात्री ९:३० वाजता दांडिया रास होईल.
  • ३ ऑक्टोबर: दुपारी ३:३० वाजता आरती-गाऱ्हाणे आणि ४ वाजता देवीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. रात्री ७:३० वाजता पुन्हा आरती केली जाईल.

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ, साळवी नगर, गोळप सडाच्या अध्यक्षा सौ. नेहा आनंद साळवी यांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन भाविकांना केले आहे.