दापोलीच्या राष्ट्रीय खेळाडू भूमी सावंतची झुंज अखेर संपली…

आज दुपारी १२ वाजता होणार मुंबईत अंत्यसंस्कार

आसुद येथील झालेल्या मँक्झिमो आणि कंटेनर मध्ये झाला होता अपघात

दापोली प्रतिनिधी:- दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावरील आसुद जोशी आळी येथील एका वळणावर दापोलीतुन आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी मँक्झिमो व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेला दिनांक २५ जुन रोजी झालेल्या अपघातात सात जणांचा याआधी दुर्दैवाने मृत्यू झाला होता. यामध्ये जागीच पाच जणांचा आणि उपचार दरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला होता.

 

आज आणखी एक दुख:दायक अशी बातमी म्हणजे हर्णे गावासह संपुर्ण दापोलीवर शोककळा पसरली आहे. या अपघातात जखमी झालेल्या दापोली तालुक्याची उत्तम खेळाडू भूमी सावंत हिला अपघातानंतर अधिक उपचारासाठी मुंबई येथील बाँम्बे हाँस्पीटल येथे उपचार चालू होते. काल रात्री अखेर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला फार मोठा धक्का आहे .दापोली तालुक्यातील लाठी असोसिएशनची ती सदस्य होती. अनेक सुवर्णपदके त्यांनी पटकावली होती. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी सकाळी तिचा सत्कार एका विशेष कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आटपून आनंदाने भूमी आपल्या पालकांसह घरी निघाली असता तिचा अपघात झाला होता. मुंबई येथे उपचारादरम्यान आज पहाटे अखेर तिची झुंज संपली आणि प्राणज्योत मालवली.

 

तिच्या जाण्यामुळे दापोली तालुक्यातील एक मनमिळावू, हरहुन्नरी आणि राष्ट्रीय खेळाडू तालुक्याने गमावला आहे अशा शब्दात श्रद्धांजली वाहीली आहे.

आपली राष्ट्रीय निर्णायक पंच, राष्ट्रीय खेळाडू, सुवर्णपदक विजेती, मनमिळाऊ, हरहुन्नरी कमांडो भूमी सावंत. आज पहाटे सोडून गेली. महाराष्ट्र ला तुझी उणीव नेहमीच जाणवत राहील अशा शब्दात लाठी असोसिएशन दापोलीने तिला श्रद्धांजली वाहीली आहे.