कोकण जिओग्राफर्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने उद्या सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : पर्यटन हा दिवसेंदिवस वाढत जाणारा एक सर्वांच्या आवडीचा विषय व सेवाभावी व्यवसाय बनला आहे. पर्यटनातून रोजगार मिळतो. पर्यटनातून नवीन प्रदेशांची माहिती मिळते. पर्यटन लहानांपासून थोरापर्यंत सर्वांना आवडता विषय आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यटनाची ओढ लागावी. पर्यटनातून भावी आयुष्यामध्ये रोजगार निर्माण करावा. किंबहुना पर्यटनातून रोजगार मिळतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने कोकण जिओग्राफर्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी या ठिकाणी, राष्ट्रीय पोस्टर मेकिंग स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि त्याचबरोबर लोककला नृत्य अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवराम ठाकूर आणि उपाध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र काटकर यांनी केले आहे.










