सदा वाडेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात
वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत
वैभववाडी l प्रतिनिधी : कोकिसरे येथील राष्ट्रीय काँग्रेसचे ग्राम कमिटी अध्यक्ष सदा वाडेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कोकिसरेचे माजी सरपंच दत्ताराम सावंत यांच्या पुढाकारातून पक्षप्रवेश पार पडला. वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दत्ताराम वळंजु, संतोष जाधव, अनिल जाधव, सुधाकर लाड, संतोष वळंजु, दिगंबर गुरव, रमेश देऊळकर, मंगेश वळंजु व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
प्रवेश करतेवेळी दत्ताराम सावंत, अभय कांबळे, राजू पवार, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.













