ओटवणेत आज सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आयोजित डबलबारी सामना

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे श्री देव रवळनाथ वाचनालय पुरस्कृत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ ओटवणे आयोजित ठीक 8.30 वाजता स्वामी समर्थ माऊली प्रासादिक भजन मंडळ विलवडे चे बुवा महेश नाईक गुरुवर्य कृष्णा राऊळ यांचे शिष्य आणि ओमकार प्रासादिक भजन मंडळ सरमळे देऊळवाडी चे बुवा संजय गावडे गुरुवर्य समीर गावडे यांचे शिष्य यांचा डबलबारीचा जंगी सामना होणार आहे. तरी भाविक भजन रसिकानी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ ओटवणे यांसकडून करण्यात आले आहे.