फोंडाघाट | कुमार नाडकर्णी —आज सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जमान्यात वाचन चळवळ खूप मागे पडले आहे अशावेळी जिल्हा परिषद प्राथ .शाळा नवीन कुर्ली येथील शिक्षिका श्रीमती मीनाक्षी वरवडेकर यांनी प्राध्यापक मधु दंडवते ग्रंथालय व वाचनालय फोंडाघाट ला पुस्तक रुपी देणगी दिली. त्यांनी दिलेली पुस्तके वाचनालयाचे केदार रेवडेकर आणि संजय नेरुरकर यांचेकडे सुपूर्त केली. वाचनालया तर्फे वरवडेकर यांचे आभार मानण्यात आले. यावेळी वरवडेकर यांनी ग्रंथालयाकडून वाचन चळवळ हाती घेण्याची मागणी करण्यात आली…









