यूज अँड थ्रो प्लास्टिकच्या पत्रावळ्या डिश यातून अन्न खाणे आरोग्यासाठी अपायकारक आहेच शिवाय यामुळे कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायत कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांचे संकल्पनेतून मार्फत बचतगटांच्या सहाय्याने सुरू करणेत आली आहे *स्टील भांडी बँक* या अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत महिला बचतगटांना 500 स्टील ताट, पेले, 1000 वाट्या, 20 स्टील टेबल, 10 हँडवॉश स्टेशन व 100 खुर्च्या पुरविणेत आले असून सदर साहित्य अल्प अशा मोबदल्यात ग्रामस्थांना पुरविले जाते. या मोहिमेचा शुभारंभ नुकत्याच झालेल्या नवरात्री उत्सवात गावात झालेल्या सामूहिक महाप्रसाद वितरण करिता करणेत आला.
या वेळी आपले अनुभव कथन करताना ग्रामपंचायत कर्मचारी अमित सावंत यांनी सदर उपक्रम मुळे दरवर्षी महाप्रसाद वितरण नंतर जमा होणाऱ्या कचऱ्यात 90 % इतकी घट झाल्याचे कथन केले.
या सोबतच ग्रामपंचायत मार्फत अत्यल्प दरात ro पाण्याचे जार सुद्धा पुढील 8 दिवसात पुरवविण्यात येणार असून
ग्रामपंचायत मार्फत सर्व ग्रामस्थांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करणेत आले आहे.












