वेंगुर्ले :
शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी आठ जण शिरोडा समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. यातील चार जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी बुडालेल्यांची शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही जण कुडाळचे तर काहीजण बेळगाव येथील असल्याचे सांगितले जात आहे.










