वेंगुर्ले l प्रतिनिधी :वन्यजीव सप्ताह निमित्त वेंगुर्ले तालुक्यातील मठ परिमंडळ मध्ये सातवायंगणी वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा कोकम, आंबा, आवळा, खैर, फणस, बेल, ऐन, किंजल अश्या स्थानिक प्रजातीची सुमारे ३०० रोपांची लागवड वनविभागा मार्फत करण्यात आली.
वनविभागाचे श्री. मिलिश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक सावंतवाडी, डॉ. सुनील लाड, सहायक वनसंरक्षक सावंतवाडी, श्री संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. सातवायंगणी भागात ही रोपांची लागवड सर्वोत्कर्ष एकता फाउंडेशन मातोंड यांच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमास सावळा कांबळे, वनपाल मठ, सागर भोजने, वनरक्षक तुळस, बाबाजी सावंत, सुरेंद्र परब, संजय परब, सोनू वेंगुर्लेकर, राजेंद्र चव्हाण, प्रसाद नाईक, प्रशांत परब, सत्यवान तांडेल, विठ्ठल गवंडे इत्यादी वृक्ष लागवड कार्यक्रमावेळी सहभागी झाले होते. सर्वांनी श्रमदानाने ही वृक्ष लागवड केलेली आहे.











