पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे शोध मोहीम
वेंगुर्ले l प्रतिनिधी :शिरोडा समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या चार पर्यटकांपैकी इक्वान कित्तूर वय १४ वर्षे रा.लोंढा बेळगाव याचा मृतदेह मोचेमाड समुद्रकिनारी असल्याचा ड्रोन मुळे दिसून आले. पालकमंत्री नितेश राणे हे या घटनेकडे लक्ष देऊन आहेत. त्यांच्या सूचनेनुसार आज सकाळपासून समुद्रात ड्रोन द्वारे शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी ड्रोनच्या कॅमेरात हा मृतदेह मोचेमध्ये दिसून आला.
याबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांनी माहिती देताना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह ड्रोन मध्ये दिसून आला. त्यानंतर प्रशासनाच्या व नागरिकांच्या सहाय्याने हा मृतदेह मोचेमाड समुद्र किनाऱ्यावर बाहेर काढण्यात आला.
पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी रुग्णवाहिकेद्वारे हा मृतदेह रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
दरम्यान अजून दोन पर्यटक समुद्रामध्ये बेपत्ता आहेत. त्यांचा शोध ड्रोन द्वारे घेतला जात आहे.











