पोईप, खोटले, हेदूळ, कसाल मार्गे सिंधुदुर्गनगरी पर्यंत एस.टी. बस फेऱ्या सुरु करा

पोईप सरपंचांचे मालवण आगर व्यवस्थापकांना निवेदन 

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोईप, खोटले, हेदूळ, कसाल मार्गे सिंधुदुर्गनगरी पर्यंत

एस.टी. बसच्या फेऱ्या सुरु कराव्यात अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पोईप सरपंच श्रीधर नाईक यांनी मालवण आगर व्यवस्थापक यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.

 

यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, संदीप भोजने आदि उपस्थित होते.

 

पोईप कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांची शाळेतील मुलांची वाहतुकीची गैरसोय होत असल्यामुळे मालवण पोईप, खोटले, हेदूळ, कसाल मार्गे सिंधुदुर्गनगरी पर्यंत जाणारी एस.टी. बस ची सकाळी ठीक ८ ची फेरी व दु. २ ची फेरी, सायं. ५ ची ओरोस सिंधुदुर्गनगरी कसाल मार्गे हेदूळ खोटले पोईप मालवण सुरु करण्यात यावी. जेणेकरून ग्रामस्थांची जिल्हा रुग्णालयात जाण्याची, शाळेतील मुलांची या मार्गांवर प्रवास गैरसोय होणार नाही. तरी या बस फेऱ्या सुरु कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.