काँग्रेस पक्षाचा एक सच्चा आणि निष्ठावान कार्यकर्ता हरपला- ॲड. हुस्नाबानू खलिफे

माजी नगराध्यक्ष कै. सुरेश कोळेकर यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रध्दांजली
राजापूर (प्रतिनिधी): काँग्रेस पक्षाशी कायमच एकनिष्ठ राहिलेल्या माजी नगराध्यक्ष सुरेश कोळेकर यांच्या निधनामुळे पक्षाने एक सच्चा आणि निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे अशा शब्दात काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस माजी विधान परिषदेचे आमदार ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
राजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश कोळेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी राजापूर तालुका काँग्रेसच्या वतीने संपर्क कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ॲड. खलिफे बोलत होत्या.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर, राजापूर अर्बन बँकेच्या संचालिका सौ. अनामिक जाधव, राजापूर खरेदी विक्री संघाचे माजी संचालक वसंत आंबेलकर, ज्येष्ठ कार्यकर्ते देवदत्त वालावलकर, लियाकत काझी, शरफुद्दीन काझी, मलिक गडकरी, मजीद सायेकर, नूर महम्मद इस्माईल मुजावर, सौरभ हरिश्चंद्र जाधव, हारून मुसा साठी, काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर, वैभव कुवेसकर, नाना कुवेसकर, डॉ. हसन शेख, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कै. कोळकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.