देवगड पंचायत समितीच्या आरक्षण सोडतची विशेष सभा १३ ऑक्टोबरला

देवगड l प्रतिनिधी :महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ अन्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (आयोगाच्या शिफारशींनुसार सभांच्या नियमावली) नियम, २०५५ नुसार पंचायत समिती देवगडची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

सदर सभा दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसीलदार कार्यालय, देवगड येथे होणार आहे. पंचायत समिती क्षेत्रातील विषयांवर चर्चा करण्यासाठी व विविध कार्यवाही मंजुरीसाठी ही विशेष सभा घेण्यात येणार आहे.

या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीतील सर्व सदस्य तसेच संबंधित अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा देवगड तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.