८० मीटर हर्डल्स स्पर्धेत भावेश घाडी प्रथम

पेंढरी पंचक्रोशी शाळेच्या विद्यार्थ्याचा जिल्हा स्तरावर प्रवेश

शिरगाव ( प्रतिनिधी)     देवगड तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा देवगड हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये पेंढरी ग्रामविकास मंडळ, पेंढरी संचलित पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी भावेश निलेश घाडी (इयत्ता ९वी) याने १४ वर्षे वयोगटातील ८० मीटर हर्डल्स (अडथळ्यांची शर्यत) या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा स्तरावर प्रवेश मिळवला.

भावेशच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

या यशामागे शाळेचे क्रीडा मार्गदर्शक श्री. रुपेश बांदेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भावेशची ही उल्लेखनीय कामगिरी पेंढरी पंचक्रोशी शाळेचा तसेच देवगड तालुक्याचा अभिमान वाढवणारी ठरली आहे.