जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश
सावंतवाडी । प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यात शिवसेना पक्षात जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. या पाश्वभूमीवर सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी भागातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.
प्रवेश केलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धडाडीच्या महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी आणि अल्पसंख्यांक शहराध्यक्ष ॲड. राबिया शेख यांचा समावेश आहे. ॲड. सायली दुभाषी (महिला शहराध्यक्ष), ॲड. राबिया शेख (अल्पसंख्यांक शहराध्यक्ष), अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष झहूर खान, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष इलियास आगा, तालुका उपाध्यक्ष तौसिफ आगा, अल्पसंख्यांक सेल तालुका सरचिटणीस सोहेल शेख, फिरोज खान, आरिफ खान, शौकत बेग, अनिस शेख, अझहर रेशमी, रियाज अत्तार, रमजान नाईकवाडी, वाजीद खान, शहाबाद आगा, मंगेश घाडीगावकर, पापा ऐन्नी, रुकसाना खान, काशिनाथ दुभाषी, साजिदा फिरोज खान, श्रावणी श्रीकांत कोरगावकर, श्रीकांत कोरगावकर, गणेश निंबाळकर, सिद्धी नागेश निंबाळकर, तैमीन तहसीलदार, फिरदोस जहूर खान, नंदिनी वेंगुर्लेकर, अलका अर्जुन नाईक, महेक महंमद खान, शहनाज आरिफ खान, अमृता अनिल नाईक, सकीना वाजिद खान, फातिमा अहमद खान, जिलेखा आयुब खान, नुसरत असिफ खान, रिदा अझहर रेशमी, हसीना पापा ऐन्नी, फरदीन शेख, वाहिदा शौकत बेग, झेबा नाईक, अनुष्का मातोंडकर, शेवंती घाडीगावकर, फैजा खान यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत सावंतवाडी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, युवा सेनेचे शहराध्यक्ष अर्चित पोकळे, कोलगाव शाखाप्रमुख गौरव कुडाळकर, समीर पालव यांसह शिवसेना व युवा सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.












