जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी

गावखडी /वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत माजी राष्ट्रपती स्व. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभीस डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार मुख्याध्यापक श्री.हिदायत भाटकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.याप्रसंगी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री.हिदायत भाटकर, विषय शिक्षिका सौ.शर्वरी करगुटकर ,उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर ,ऐश्वर्या गुरव , शालेय मुख्यमंत्री कु.मैत्रेयी अभ्यंकर,उपमुख्यमंत्री कु.रचित म्हादये आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री.हिदायत भाटकर विषय शिक्षिका सौ.शर्वरी करगुटकर , उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर , यांनी माजी राष्ट्रपती स्व.डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले.त्यानंतर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने पुस्तकांचे वाचन करण्याच्या उद्देशाने शालेय ग्रंथालयातील पुस्तके मुलांना देण्यात आली आणि सर्व विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणादिना निमित्त पुस्तक वाचन केले.
शेवटी उपशिक्षिका संजया पावसकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.