गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर पंचायत समिती गणातून कळंबुशी गावच्या माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती अंकिता चव्हाण इच्छुक आहेत.
श्रीमती अंकिता चव्हाण ह्या आमदार शेखर निकम यांच्या निकटवर्तीय व आघाडीच्या कार्यकर्त्या मानल्या जातात.२०११ पासून आमदार शेखर निकम यांचा सोबत पक्षात कार्यरत आहेत. २०१४ ,२०१९, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम यांच्या साठी महिला प्रचारक म्हणून भरीव काम केले आहे.
कळंबुशी गावच्या सरपंच म्हणून ५ वर्ष यशस्वी काम केले आहे.राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. धामापूर गणात चांगला जनसंपर्क आहे. लोकोपयोगी उपक्रम, विद्यार्थी साठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम शासकीय योजना करीत विविध कॅम्प घेणे याने महिलांमध्ये दांडगा संपर्क आहे.
सर्वसाधारण आरक्षण पडल्याने, पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवून मोठ्या फरकाने निवडून येण्याची खात्री त्यांना वाटत आहे.











