मसुरे | झुंजार पेडणेकर :सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत देवगड तालुक्याचे नेतृत्व करताना श्री भगवती हायस्कूल मुणगेच्या विध्यार्थिनींनी उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये मुलींच्या 17 वर्षाखालील गटामध्ये लांब उडी प्रकारामध्ये
कुमारी लिशा दयानंद तेली (इयत्ता 9वी) हिने द्वितीय क्रमांक पटकवला तर कुमारी प्रांजल ऋषिकेश कामतेकर (इयत्ता 9वी) हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकवला.या दोन्ही विध्यार्थिनींनी सलग दुसऱ्या वर्षी विभाग स्तरावर मजल मारली आहे. या विध्यार्थिनींना प्रशालेचे सहाय्यक शिक्षक हरिदास महाले व प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी आणि सहभागी मुलींचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका,सहकारी शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.












