6 जनावरे जखमी,एक बैल दगावला
गुहागर । प्रतिनिधी
तालुक्यातील कुटगिरी गावठाणानजीक असलेला लोखंडी साकव पडला असून त्याखाली ६-७ जनावरे यामध्ये अडकून पडली होती.यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला असून 6 जनावरे जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.तसेच उपअभियंता जि.प. बांधकाम व पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या देखील गुहागर आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या. दरम्यान या दुर्घटनेत एक बैल दगावला असून उर्वरित जनावरे बाहेर काढण्यात आली आहेत. यामध्ये 6 जनावरे जखमी झाली आहेत.











