ऐन सणासुदीच्या तोंडावर नियतीचा घाला
प्रतिनिधी/रोहन कांबळे
कोल्हापूर: करवीर तालुक्यातील म्हालसवडे येथील दोघा पती पत्नीचा विहारीत बुडून मृत्यू झाला.रंगराव रामा कांबळे (व.व.५४) व मनीषा रंगराव कांबळे (व.व.४८) अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.या हृदयाद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे
मिळालेल्या माहितीनुसार,रंगराव कांबळे व त्यांच्या पत्नी मनीषा कांबळे हे दोघे १८ ऑक्टोंबर रोजी शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेले होते.मनीषा कांबळे या दुपारी त्याच्या शेतातील गोठ्यातील जनावरांना शेतातच जवळ असलेल्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. दगडवरून
त्यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांनी आरडाओरड केली असता त्यांचे पती रंगराव कांबळे हे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांनी विहरीत .
उडी मारली.त्यांना पोहता येत नसल्याने दोघे ही खोल विहरीत बुडाले. पाण्यावर तरंगणारे व चप्पल पाहिल्याने शेजारील शेतकऱ्यांना हे दांपत्य असल्याचे लक्षात आले. त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना, नातवंडे असा परिवार आहे.करवीर पोलिस स्टेशनमधे घटनेची नोंद झाली आहे.












