जीवनासाठी झुंज : आकेरीतील रामचंद्र सावंत यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

कुडाळ तालुक्यातील आकेरी (परबवाडी) येथील रामचंद्र उर्फ सचिन सत्यवान सावंत, सध्या मुंबईत उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ७० टक्के यकृत निकामी झाले आहे, तसेच मूत्रपिंडाचे नुकसान आणि फुफ्फुसांचा संसर्ग झाला आहे. सध्या ते उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, मुंबई येथे आयसीयूमध्ये उपचाराधीन आहेत.

 

त्यांच्या उपचारासाठी आतापर्यंत ₹१०,९७,२१० इतका खर्च झाला असून, कुटुंबाची सर्व बचत संपली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनरक्षक उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज भासत आहे.

 

त्यांची पत्नी श्वेता सावंत यांनी नागरिकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

 

देणगी लिंक: impactguru.com/fundraiser/help-for-ramchandra-sawant

 

UPI ID: supportramcha7@yesbank