सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

 

कणकवली :

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ आणि २८ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची, तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

 

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि विद्युत उपकारणांची हानी होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.