पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न..
वेंगुर्ले l दाजी नाईक :कोकण आपत्कालीन निधी अंतर्गत सुमारे चार कोटी रुपये मंजूर असलेल्या रेडी येथील यशवंतगड धूपप्रतिबंधक बंधारा कामाचे भूमिपूजन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यटन वाढीच्या दृष्टीने रेडी यशवंतगड समुद्रकिनारा ते शिरोडा वेळागर असा झुलता पूल होण्याबाबत मंजुरी मिळावी या बाबत चे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने मंत्री नितेश राणे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच लक्ष्मीकांत भिसे, माजी सभापती अजित सावंत, अश्विनी सातोस्कर, माजी उपसरपंच नमिता नागोळकर तसेच मानसी राणे, गणेश भगत, पिंट्या राणे, नितीन सावंत, जगदीश गवंडी, देवेंद्र रेडकर, चक्रपाणि गवंडी, वैभव आसोलकर, शांताराम कांबळी, बाबाजी राणे, रोहित गवंडी, अण्णा गडेकर, संजू कांबळी, अरुण राणे, महेश कोनाडकर, श्रध्दा धुरी, ग्रा.प. सदस्य रिचा सावंत, सागर राणे यांच्या सह रेडी ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
*रेडी येथील श्रीदेवी माऊली चे घेतले पालकमंत्र्यांनी दर्शन*
रेडी येथील आपल्या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी श्री. देवी माऊली चे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान विश्वस्त यांनी मंत्री राणे यांचा सत्कार केला. यावेळी भानुदास राणे, मंगेश राणे, बाबाजी राणे तसेच मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.












