रत्नागिरी: राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) २ महाराष्ट्र नेवल युनिट एन सी सी, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रि मेनु २०२६ कॅम्प’चा प्रारंभ आज, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ पासून रत्नागिरी येथे झाला आहे. हा कॅम्प दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. रत्नागिरी येथे आयोजित या कॅम्पमध्ये विविध जिल्ह्यांमधून राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट सहभागी झाले आहेत.
शिस्त, नेतृत्व आणि साहसी प्रशिक्षणावर भर
हा कॅम्प रत्नागिरी ते विजयदुर्ग या महत्त्वपूर्ण ‘मेन्यू सेलिंग एक्सपिडिशन’चा अधिकृत पूर्वप्रसारक (Pre-cursor) आहे. यामध्ये कॅडेट्सनी जलतरण कौशल्य चाचणी पूर्ण केली असून, त्यांची कार्यक्षमता व उत्कृष्टतेसाठी तत्परता सिद्ध करण्यात आली. तसेच, भाटये बीच येथे ‘बोट पुलिंग’ची (नाव ओढणे) आणि ‘सेलिंग’चे (जहाज चालवण्याचे) प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणातून सहभागी कॅडेट्सना आगामी मोहिमेसाठी आवश्यक असलेले ‘सी-मॅनशिप’ (seamanship) आणि संघभावना संबंधित कौशल्ये प्राप्त झाली आहेत.
या उपक्रमामुळे शिस्त, नेतृत्व आणि सैन व नागरी सहभागाचे मूल्य अधोरेखित होते, ज्यामुळे यशस्वी प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कमांडर रामानुज दिक्षित, कमांडिंग ऑफिसर, २ महाराष्ट्र नेवल युनिट एन सी सी, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पमध्ये एकूण १८३ राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यासोबत ०१ नेव्ही अधिकारी, ०२ एन सी सी ऑफिसर, ०२ जे सी आय, ०८ नेव्ही स्टाफ, ०१ आर्मी स्टाफ आणि ११ सिव्हिल स्टाफ उपस्थित आहेत.










