स्नेहबंध मंच चिपळूणतर्फे नारी सन्मान समारंभ उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील स्नेहबंध मंच या सामाजिक संस्थेमार्फत जि.प. सदस्या व माजी सभापती सौ. पूजा \निकम व हेड कॉन्स्टेबल सौ. रमा करमकर यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा शारदोत्सवाच्या निमित्ताने नारी सन्मान करण्यात आला. तसेच स्नेहबंध मंचच्या सर्व संचालिका यांचाही सन्मान करण्यात आला.
हा समारंभ स्नेहबंध मंचचे अध्यक्ष सीताराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे संजय वरेकर, प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच स्नेहबंधचे उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, सचिव विकास ढवण, संचालक प्रकाश सावर्डेकर, विलास सकपाळ, अरुण कदम, संचालिका नसरीन खडस (नगरसेविका), प्रणिता धामणस्कर, नम्रता आग्रे, अमिता मोमीन, श्रध्दा कदम, यांच्यासह सती हायस्कूलचे हातणकर सर, सौ. सुतार, सर्व विद्यार्थी व उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष सीताराम शिंदे यांनी स्नेहबंध मंचने गेल्या दोन वर्षात राबविलेले सामाजिक, उपक्रम, यांची सविस्तर माहिती सादर केली. तसेच महिलांनी अशाप्रकारे उत्तुंग भरारी घेणे ही काळाची गरज आहे. असे सांगितले.
सत्कारमूर्ती सौ. पूजा निकम यांनी सध्या सर्व तालुक्यात आरोग्य विषयक राबवित असलेले उपक्रमाचे सादरीकरण केले. तसेच सौ. रमा करमरकर यांनी पोलीस खात्यात धाडसाने कसे काम करीत आहे, गुन्हेगारांना जरब कशी बसवित आहे, हे सांगून स्वतः राबवित असलेले उपक्रम सायकलींग, ट्रेडींग, योगासन, याची माहिती दिली. प्रमुख पाहुणे संजय वरेकर यांनी आपल्या विद्यालयाची होत असलेली प्रगती, ग्रामस्थ विद्यार्थी व संस्था चालक यांचा लाभणारा सहभाग याबद्दल माहिती दिली. तसेच उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्नेहबंध मंचबाबत विचार मांडले. सन्मानपत्राचे वाचन प्रकाश सावडेकर व विजय थोरे यांनी केले. प्रकाश सावर्डेकर यांनी आभार मानले.