करुळमध्ये “माऊली माऊली” चा जयघोष : वारकरी पंढरपूरकडे रवाना 

वैभववाडी l प्रतिनिधी :      ज्ञानोबा माऊली… तुकाराम चा जयघोष करत करूळ गावातील वारकरी कार्तिकी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. करुळ ते पंढरपूर अशी वारी गावातील वारकऱ्यांनी गेली २१ वर्ष सुरू ठेवली आहे. येथील श्री. रामेश्वर व केदारलिंग मंदिरात पूजन करून आज सकाळी वारकरी मार्गस्थ झाले आहेत.

दोन एसटी बस मधून तब्बल ८० वारकरी पंढरपूर यात्रेसाठी निघाले आहेत. यामध्ये वयोवृद्ध वारकरी, महीला वारकरी व युवकांचा समावेश आहे.

वारकरी सांप्रदाय करुळ चे प्रतिनिधी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, विजय सावंत, संजय कदम , भास्कर सावंत यांच्यासह असंख्य वारकरी मंडळींचा वारीत समावेश आहे.