कोटचे उपसरपंच आणि कट्टर भाजप कार्यकर्ते रवींद्र नारकर यांचे निधन

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोट गावचे सुपुत्र, उपसरपंच आणि भाजपाचे कट्टर कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या रवींद्र नारकर या युवा कार्यकर्त्याचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले .
भाजपा पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या रवींद्र नारकर हे स्वभावाने मनमिळाऊ होते. त्यांचा मित्रपरिवार देखील तालुक्यात मोठा होता. विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांचे खास मित्रत्वाचे संबंध होते. कट्टर भाजपा कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती .
रवींद्र नारकर हे गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. या युवा कार्यकर्त्याचे रविवारी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या या आकस्मिक निधनाने त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे .तर तालुक्यातून देखील त्यांच्या या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.