अशोकाच्या सावलीत बहरलेलं कलादालन…

गौरव पोंक्षे..
कै.राम गणेश गडकरी यांच्या एका नाटकातील वाक्य मला आठवत.संकल्प आणि सिद्धी याच्या मध्ये परमेश्वरी इच्छा उभी असते…खरच!.प्रशालेत कलादालन सुरु करण्याचा संकल्प सोडला गेला..आणि परमेश्वरी इच्छेने व आद्य संस्थापकांच्या आशीर्वादाने तो पूर्णही झाला.२०२४ साली सुरु झालेल्या या कलादालन नुसतं सुरु न होता..ते एखाद्या वाहत्या झऱ्या प्रमाणे सदैव प्रवाही राहिलं..म्हणूनच अनेक कलावंत या कलादालनाच्या किनाऱ्यावर येऊन बसले.जसा राजहंस प्रवाही पाण्यावर स्वार होतो तसे.हे सगळं घडलं ते सन्मानीय अशोकजी पोंक्षे यांच्या अनमोल देणगीतून..आज अशोकाच्या सावलीत हे कलादालंन बहारलंय अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही..
२०२१ साली आनंद साठे यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या मंडळाने अनेकविध उपक्रम,दालनं सुरु केली.अद्ययावत संगणक कक्ष, संगीत कक्ष,क्रीडाकुल,कॉन्फरन्स हॉल,अद्ययावत अस मुख्याध्यापक कक्ष व कार्यालय,मल्लखांब यांचा नामोल्लेख करावा लागेल..त्यातच एक भर पडली ती कलादालनाची!
कविवर्य मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी,गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी..हे खर आहे.पण तो माणूस शोधण्यासाठी डोळस पणा हवा हे खर…आणि तो गर्दीतला माणूस आम्हांला मिळाला..
दाता भवती वानवा…अस सुभाषितकाराने म्हटलंय खरं..पण आमची शाळा,संस्था त्याला अपवाद आहे..दात्यांची वानवा केव्हाच जाणवली नाही..देणाऱ्याचे हात हजार जरी असले,तरी माझी झोळी दुबळी होणार नाही याकडे आम्ही लक्ष द्यायला हवं..शाळेत नवनवीन काही सुरु करावं अशी संस्थेची धारणा असताना..मी ज्येष्ठ रंगकर्मी,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते आणि आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष आणि विशेषतः माखजन हायस्कुल चे माजी विद्यार्थी अशोक काका पोंक्षे यांना शाळेला देणगी देण्यासाठी आग्रह धरला.तस अशोक काका सामाजिक संस्थांना,कॅन्सर ग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्थांना बळ देतात हे सर्वश्रुत होत. किंबहुना कोरोनाच्या काळात गरीब कुटुंबाना केलेली निस्वार्थ मदत मी जवळून पाहिली होती.या साऱ्या कार्याची दखल घेत अशोक काकांना २०२३ साली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे हस्ते डोंबिवलीच्या हेरंब म्युझिक फौंडेशन चा समाजरत्न पुरस्कार देखील मिळाला होता.
हेच डोळ्यासमोर ठेऊन पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी फायदा होईल व त्याचा उपयोग पंचक्रोशीलाच नव्हे तर दशक्रोशीला देखील होईल व पर्यायाने शाळेला वेगळी ओळख निर्माण होईल अशी देणगी द्या असा आग्रह धरला.अशोक काका नी तात्काळ काय करता येईल?शाळेला कशाची आवश्यकता आहे असे विचारले.मी लगेचच तत्कालीन अध्यक्ष आनंद साठे यांचे जवळ चर्चा करून,चर्चेप्रमाणे पंचक्रोशीच्या हिताच्या दृष्टीने शाळेला असणाऱ्या गरजांचा उतरता क्रम अशोक काकांना सांगितला.यामध्ये सगळ्यात अग्रक्रमावंर होत ते कलादालन..अशोक काका पोंक्षे यांनी तात्काळ मला आपण कला दालनासाठी देणगी देऊया असे कबूल केले.पण कलादालनाचा भविष्यात शाळेतील,पंचक्रोशीतील, विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याविषयीं अशोक काकांनी माझा कडून जाणून घेतले.व कलादालन निर्मितीच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली.म्हणता म्हणता महिन्या भरात कलादालन साकार झाले.
तत्पूर्वी सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत झालेल्या सूर्यनमस्कार उपक्रमाच्या पूर्णाहुतीला प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे व अशोक काका पोंक्षे उपस्थित होते.त्यावेळी शाळेचा एकंदर चढता आलेख पाहता,कलादालनाची खरंच गरज वाटत आहे.असे शरद पोंक्षे यांनी नमूद केले होते.व ती उणीव अशोक काका पूर्ण करत असल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे सांगितले.त्याचं रथसप्तमी दिनी अशोक काकांनी ३ लाख रुपयांचा चेक संस्था अध्यक्ष आनंद साठे यांना सुपूर्द केला.एक महिन्याच्या आत कलादालंन साकार झाले.व अशोक काका पोंक्षे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कलादालना चे शानदार उदघाटन झाले.
तत्कालीन संस्था अध्यक्ष आनंद साठे,पराग लघाटे व अन्य संचालकांनी विशेष प्रयत्न,व मेहनत घेत आखीव रेखीव कलादालन कसे होईल याकडे लक्ष दिले.पराग लघाटे यांनी एक आकर्षक कलादालन कसे होईल हे आवर्जून पाहिले.यावेळी इंग्रजी अध्यापनाचा विषय असून देखील कलोपासक असलेले शिक्षक अमोल पाटील यांनी आपले भरीव योगदान दिले.व आजही आपले नियमित अध्यापनाचे काम करून, ही कलादालनाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन समर्थ पणे पेलत आहेत.
पुढे कलादालनात विद्यार्थी बसून चित्रकलेत रुची घेऊन काहीतरी करत आहेत, याची छायाचित्र मी अशोक काकाना पाठवली.व चर्चा करताना आपण जर थोड सहाय्य केलात तर संस्था,शाळा कलादालनाच्या माध्यमातून स्पर्धा घेऊ शकते याकडे लक्ष वेधले.याला ही अशोक काकांनी होकार दिला व त्यानंतर मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर आणि संचालक मंडळ यांचेशी चर्चा होउन जिल्हास्तरीय निसर्गचित्र स्पर्धा व दशक्रोशीतील शाळांसाठी चित्रकला स्पर्धा झाली.यासाठी झालेला ६० हजार इतका खर्च अशोक काकांनी केला.जिल्हाभऱ्यातून उदंड प्रतिसाद मिळाला.व याच स्पर्धेने ‘न भूतो न भविष्यती’ या उक्तीचा अर्थ पटवून दिला. व स्पर्धेच यश लक्षात घेऊन पुढील वर्षी आपण राज्यस्तरीय स्पर्धा घेऊया असे लक्ष वेधले. संस्था अध्यक्ष किशोर साठे यांनी मंडळातर्फे अनुमती दर्शवत होकार दिला.व यावर्षी १४ नोव्हेंबरला राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा होत आहे.व १२ रोजी दशक्रोशीतील शाळांसाठी चित्रकला स्पर्धा होत आहे.यासाठी होणारा सुमारे ८० हजार इतका खर्च अशोक काकाच करणार आहेत.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष किशोर साठे व कार्यकारी मंडळ व,शाळेचे मुख्याध्यापक महादेव परब आणि शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विशेष प्रयत्नशील आहे.
पंचक्रोशीवर असलेल्या व एक माजी विद्यार्थी म्हणून शाळेवर असलेल्या,अशोक काकांच्या आभाळमायेमुळेच,कलादालनाची चळवळ चालू ठेवणे सुलभ होत आहे.
अशीच कलादालनाची चळवळ अशोकाच्या छायेत अविरत चालू राहो ही मारुतीरायाच्या व श्री सूर्यनारायणाच्या चरणी प्रार्थना..