राजापुरात लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ज्योती सुनिल खटावकर रा. वरचीपेठ राजापूर यांनी हिंदू महासभेच्या वतीने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
ऑनलाईन अर्ज करून त्याची प्रत त्यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विकास गंबरे यांच्याकडे सुपुर्द केली आहे.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सोमवारी 10 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. असून अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर पर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ज्योती सुनिल खटावकर रा. वरचीपेठ राजापूर यांनी हिंदू महासभेच्या वतीने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी केली असून पाच टेबल हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणेकामी तर एक टेबल हे नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. तर याबाबत माहिती देण्यासाठीही टेबल ठेवण्यात आले आहे.