आंगणेवाडी येथे १७ रोजी श्री भराडी देवी मंदिर सुवर्ण कलश २१वा वर्धापनदिन !

मसुरे | झुंजार पेडणेकर        :आंगणेवाडी येथील श्री

श्री भराडी देवी मंदिर सुवर्ण कलश २१वा वर्धापनदिन सोहळा १७ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरामध्ये आंगणे कुटुंबीयांमार्फत विविध धार्मिक विधीचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १७ नोव्हेंबर

सकाळी ८.०० वा. देवी याग यज्ञ,दुपारी १२.०० वा. – सुवर्ण कलश व ध्वज पूजा,दुपारी १२.३० वा. आरती. तिर्थप्रसाद,दुपारी १.०० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७.०० वा.सुस्वर भजन,

रात्री ठिक १०.०० वा. दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा ‘जिव्हेश्वर ‘ हा ट्रिकसिन नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.