भाजपा मित्र पक्षांचा बिहारमध्ये दणदणीत विजय, शिरगाव मध्ये विजयोत्सव

बिहार विधानसभा निवडणुकीत निर्णायक विजय; जनतेचा मतदानातून विश्वासाचं प्रकटीकरण

आज बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजपा) व त्याच्या मित्रपक्षांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आहे. ट्रेंडनुसार राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) यांनी अंदाजे २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतलेली आहे, आणि भाजपाचं एकल सर्वात मोठं पक्ष दिसत आहे.

 

या व्यापक यशाच्या आनंदानिमित्त, देवगड तालुक्यातील शिरगाव येथे फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, सुभाष नार्वेकर, मंगेश लोके, महेश मेस्त्री, प्रकाश राणे, अजय परब, सुहास राणे, राजू साटम, सिद्धेश लोके, युवराज माळवदे, युधिराज राणे, संजय शिंदे, पोरे, विठोबा घाडी, पांडुरंग घाडी, आदित्य तावडे, महेश साटम हे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.