शिरोडा खर्डेवाडी शाळेला माजी आम. शंकर कांबळी यांच्या तर्फे कलर प्रिंटर भेट…

राजन कांबळी यांच्या कडून शाळेचे कंपाउंड वॉल बांधकाम पूर्ण..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :पूर्ण प्राथमिक शाळा, खर्डेवाडी (शिरोडा) या शाळेच्या विकासासाठी माजी आमदार श्री. शंकर कांबळी यांनी कलर प्रिंटरची भेट देऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसंच, शाळेच्या सुरक्षिततेसाठी आणि सौंदर्यासाठी श्री. राजन कांबळी यांनी कंपाउंड वॉल बांधून देण्याचे काम पूर्ण करून शाळेला मोठी मदत केली.

या दोन्ही मान्यवरांच्या कार्याची नोंद ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी माजी सरपंच श्री. विजय पडवळ, श्री.श्रीकृष्ण पडवळ, श्री.सचिन कांबळी, श्री.पांडुरंग नाईक, श्री. गौरेश बर्डे, श्रीमती रश्मी डिचोलकर, श्रीमती रागिणी अणसूरकर, श्रीमती विनया मोरे, श्रीमती तुलसी जाधव यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

शाळेचे शिक्षक श्री.सुनिल वाघ यांनी मान्यवरांचे आभार मानताना सांगितले की,

“या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणि सुरक्षिततेत भर पडणार आहे. शाळेचा विकास हा सर्वांच्या सहकार्यानेच शक्य आहे.” शाळेला मिळालेल्या या योगदानामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनीही मनापासून समाधान व्यक्त केले.