चिपळूण : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल मिरजोळी येथे शुक्रवारी दि. १४ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (चाचा नेहरू) यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कुमारी आराज्ञा कांबळे या विद्यार्थिनीने अतिशय उत्तम सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ समिधा डांगे, सौ मृणाली जाधव, सौ विद्या जाधव, सौ साक्षी कदम, सौ आरेकर रागिनी, सौ. निकिता कुळे, सौ. अंकिता आंब्रे, भैय्या पाटील आणि इयत्ता ८ वी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कुमारी अक्षरा निकम या विद्यार्थिनीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. शिक्षिका सौ. संध्या बोराटे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यालयांमध्ये फनी गेम्स घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी फनी गेम्सचा मनमुराद आनंद लुटला. संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी इयत्ता ८ वी अ च्या वर्गाने अतिशय व्यवस्थित पार पाडली. दुर्वांक जाधव या विद्यार्थ्याने आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.











