पालीत उद्या सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

 पाली
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ तसेच ७२ वा अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा सहकारी बोर्ड लि. रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचे विद्यमाने तक्षशिला ग्रा. बि. सह. पत. पाली, शिवशाही ग्रा. बि. सह. पत. पाली, रणजीत ग्रा. बि. सह. पत. पाली, राजापूर तालुका कुणबी सह. पत. शाखा पाली, नाणीज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा. लि. नाणीज, पाली पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सोसा. लि. पाली. यांचे सहकार्याने उद्या दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशिक्षण कार्यशाळा डी. जे. सामंत सिनीअर कॉलेज पाली सभागृह पाली येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात सकाळी १०:३० ते ११:०० वाजता पाली तिठा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे तेथून पाली चौक ते डी. जे. सामंत सिनीअर कॉलेज पाली पर्यंत सहकार दिंडी काढण्यात येईल त्यानंतर,
सकाळी ११:१० सहकार ध्वज अनावरण,सकाळी ११:१५ ते ११:३० दीपप्रज्वलन, सकाळी ११:३० ते १२:०० सहकार प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मानित करणे, दुपारी १२:०० ते १२:१० कार्यक्रम प्रस्तावना जिल्हा सह.बोर्ड लि.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, दुपारी १२:१० ते १२:४० उपस्थित मान्यवरांची मनोगत दुपारी १२:४० ते ०१:२० सहकार मार्गदर्शक प्रा.डॉ.काशिनाथ चव्हाण यांचे युवक व युवतींना सहकार चळवळीचे मार्गदर्शन, दुपारी ०१:२० ते ०१:३० आभार व समारोप करणे.
वरीलप्रमाणे सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.