वेंगुर्ले न.प.निवडणूक : शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ अर्ज दाखल…

नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ तर नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज….

निवडणूक कक्षात मंगळवारी होणार दाखल उमेदवारी अर्जांची छाननी

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवसापर्यंत थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ तर २० नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या मंगळवारी दाखल अर्जांची निवडणूक कक्षात छाननी होणार असून उमेदवारी मागे घेण्याच्या कालावधी नंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत एकही उमेदवार देऊ शकले नाही.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवार १७ नोव्हेंबर शेवटचा दिवस होता. त्यामुळे उर्वरित उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी सकाळपासून लगबग होती. आज नगराध्यक्ष पदासाठी विनायक सदानंद गवंडळकर( भाजप), विलास प्रभाकर गावडे (काँग्रेस) आणि नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर नगरसेवक पदासाठी
प्रभाग क्र. १ ब
ॲड. मनिष वामन सातार्डेकर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
वंदन मेघः शाम वेंगुर्लेकर (अपक्ष)
प्रभाग क्र. २ अ
महिमा महेंद्र घाडी (शिवसेना)
प्रभाग क्र. २ ब
विधाता रमाकांत सावंत (काँग्रेस)
प्रभाग क्र. ३ अ
विनायक सदानंद गवंडळकर (भाजप)
प्रभाग क्र. ५ ब
विवेक श्रीगुरुनाथ कुबल (उबाठा)
सुयोग विजय चेंदवणकर (अपक्ष)
सुनिल शशिकांत डुबळे
(शिवसेना)
प्रभाग क्र. ६ अ
गितांजली गजानन गांवकर
(शिवसेना)
प्रभाग क्र. ७ अ
सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस)
प्रभाग क्र. ७ ब
बाळकृष्ण पुंडलिक हुले (शिवसेना)
पांडुरंग लक्ष्मण मालंडकर
(काँग्रेस)
ॲड. गोविंद गोपाळ टाककर (अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्र. ८ अ
सुकन्या पॉल फर्नांडीस (काँग्रेस)
सुमन संदेश निकम (उबाठा)
प्रभाग क्र. ८ ब
संदेश प्रभाकर निकम (उबाठा)
अमर भास्कर जाधव(भाजप)
अब्दुलरहिम अल्ली शेख (काँग्रेस)
अजित यशवंत कनयाळकर(भाजप)
प्रभाग क्र. ९ अ
सचिन फटू वराडकर
(अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस)
चंद्रकांत कृष्णा जाधव (अपक्ष)
प्रभाग क्र. ९ ब
रत्नप्रभा सोमनाथ टोमके (अपक्ष)
यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या १८ नोव्हेंबर रोजी सकाळी दाखल उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरसेवक पदासाठी तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आज वेंगुर्ले नगर परिषदेच्या निवडणुकीत तीन जागांवर नगरसेवक पदासाठी उमेदवार देण्यात आले. यामध्ये प्रभाग १ मधून ॲड. मनीष सातार्डेकर, प्रभाग ७ मधून ॲड. जी जी टाककर आणि प्रभाग ९ मधून सचिन वराडकर यांचा समावेश आहे.

वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालयातील निवडणूक कक्षात या तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सचिव एम. के. गावडे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, शहर अध्यक्ष सुरज परब, जिल्हा सचिव सुशील चमणकर, महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, युवक अध्यक्ष गजानन कुंभार, युवती अध्यक्ष निधी शिरोडकर, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर व कार्यकर्ते अनंत पाटकर, संजय वराडकर, सौ.निलिमा वराडकर, योगेश्वर वेंगुर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते.