सावंतवाडीत नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवारांचे ११ अर्ज

तर नगरसेवकपदासाठी ११४ अर्ज दाखल

​सावंतवाडी । प्रतिनिधी : ​सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरिता ११ आणि नगरसेवक पदाकरिता ११४ असे मिळून एकूण १२५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (दिनांक आज) तब्बल ६२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. या अर्जांची छाननी प्रक्रिया उद्या सोमवार सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २१ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

​या निवडणुकीमध्ये शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वगळता इतर सर्व प्रमुख पक्षांनी आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणात उतरवले असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​नगराध्यक्षपदासाठी ११ अर्ज, ६ उमेदवार रिंगणात
​नगराध्यक्षपदासाठी एकूण ६ उमेदवारांनी मिळून ११ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजपकडून श्रद्धा भोंसले यांनी १ आणि अपक्ष म्हणून २ असे एकूण ३ अर्ज भरले आहेत. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी २, उबाठा शिवसेनेकडून सीमा मठकर यांनी १, शिंदे शिवसेनेकडून ॲड. निता सावंत-कविटकर आणि भारती मोरे यांनी प्रत्येकी १, काँग्रेसतर्फे सौ. साक्षी वंजारी यांनी १ तर अपक्ष निशाद बुराण यांनी २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

​नगरसेवकपदासाठी प्रमुख पक्षांचे उमेदवार
नगरसेवक पदासाठी विविध पक्षांतील प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यात भाजपकडून मोहिनी मडगावकर, दुलारी रांगणेकर, बबन साळगावकर, सुनिता पेडणेकर, उदय नाईक, समृद्धी विर्नोडकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, सुधीर आडीवरेकर, सुकन्या टोपले, राजू बेग, मेघना राऊळ, साईनाथ जामदेव, ॲड. अनिल निरवडेकर, मेशव शेख, अमित गवंडळकर, विणा जाधव, मेघा डुबळे, गौरव जाधव, मेघना साळगावकर, गोपाळ नाईक, ॲड. रूजूल पाटणकर, सुकन्या टोपले आणि निलम नाईक या २४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेना पक्षाकडून ॲड. सायली दुभाषी, देव्या सुर्याजी, सुरेंद्र बांदेकर, वेदीका सावंत, उत्कर्षा सासोलकर, शर्वरी धारगळकर, अनारोजीन लोबो, संजू परब, बंड्या कोरगावकर, हर्षा जाधव, बाबु कुडतरकर, स्नेहा नाईक, संजना पेडणेकर, पुजा आरवारी, गोविंद वाडकर, वैभव म्हापसेकर, अजय गोंदावळे, दिपाली सावंत, बासित पडवेकर, आरती सावंत, परिक्षीत मांजरेकर आणि नासिर पटेल अशा एकूण २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

उबाठा गटाकडून निशांत तोरसकर, आर्या सुभेदार, शैलेश गवंडळकर, तेजल कोरगावकर, कृतिका कोरगावकर, संदीप वेंगुर्लेकर, समीरा खलिल, उमेश कोरगावकर, शेखर सुभेदार, क्षीप्रा सावंत, श्रृतिका दळवी, संदीप राणे, क्षीप्रा सावंत, नियाज शेख, देवेंद्र टेमकर, गजानन वाडकर, दिप्ती केसरकर, अफरोज राजगुरू, प्रदीप कांबळे, गिता सुकी आणि निकिता केसरकर अशा एकूण २१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

​ काँग्रेस पक्षाकडून तौकीर शेख, शिल्पा कांबळी, गणपत नमशी, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, स्नेहल मसुरकर, सुनील पेडणेकर, निशाब शेख, ॲड. समीर वंजारी, ॲड. रितू परब, साक्षी वंजारी, अरूण भिसे, संतोष जोईल, ॲड. प्रज्ञा चौगुले, सुमेधा सावंत, शाम वाडकर आणि प्रणाली नाईक असे १६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
​राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): या गटाकडून उदय भोसले, आगस्तीन फर्नांडिस, दिशा कामत, रंजना निर्मल, ॲड. सत्यवान चेंदवणकर असे ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

​या प्रमुख पक्षांव्यतिरिक्त प्रसाद नाईक, ऋग्वेद सावंत, बबलू मिशाळ, आशुतोष हेळेकर, नासिर शेख, हरेश कोटेकर, शबाब शेख, अर्चित पोकळे, लतिका सिंग, राधिका चितारी, अस्मिता परब, नासिर पटेल, सुरेश भोगटे, समिउल्ला ख्वाजा, जावेद शाह, फरलाद बागवान, गौरव जाधव या १७ जणांनी अपक्ष म्हणून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करून निवडणुकीतील रंगत वाढवली आहे.

​छाननी प्रक्रिया आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.