खेड – खेड तालुक्यातील प्रख्यात आणि वरिष्ठ वकील अॅड. सुधीर शरद बुटाला यांची शिवसेना लीगल सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या निवडीचे कायदे क्षेत्रात आणि स्थानिक पातळीवर मोठे स्वागत करण्यात आले आहे. तसेच एडवोकेट दिलीप चव्हाण यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दलही वकील सहकाऱ्यांनी गौरव केला.
या निवडीच्या निमित्ताने आयोजित सत्कार कार्यक्रमात खेड येथील अनेक मान्यवर वकील उपस्थित होते. यामध्ये अॅड. मिलिंद जाडकर, अॅड. शशिकांत चव्हाण, अॅड आनंदराव भोसले, अॅड. मृणाल जाडकर, अॅड. सागर देवळेकर, अॅड. समीर शरद शेठ, अॅड. सिद्धी खेडेकर, अॅड. प्रितेश जाधव, अॅड. अवंती जंगम, अॅड. गमरे, अॅड. सैफ चौगुले, अॅड. दिनेश महाडिक, अॅड. गांधी, अॅड. गायकवाड, अॅड. प्रणित साळवी, अॅड. आगरी यांसह अनेक कायदेविषयक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्वांच्या वतीने दोन्ही निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अॅड सुधीर बुटाला यांनी आपल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले. या पदाला पूर्ण न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी अॅड. शशिकांत चव्हाण यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य पुढील कार्यात लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कायदेविषयक सुविधा स्थानिक पातळीवर अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ते प्रयत्नशील राहणार असल्याचे बुटाला यांनी नमूद केले. “वकील बांधवांसाठी ग्राहक मंच तसेच इतर महत्त्वाच्या न्यायिक सुविधा खेडमध्ये सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,” अशी ग्वाही त्यांनी सर्वांसमोर दिली. हा
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून नव्या पदाधिकाऱ्यांकडून प्रभावी आणि जनहिताचे कार्य होईल, अशी अपेक्षा उपस्थित वकील बांधवांनी व्यक्त केली.











