वेंगुर्ले येथे अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रचार रॅलीला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद.

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीचे उमेदवार ॲड गोविंद गोपाळ उर्फ जी. जी. टाककर, ॲड मनीष सातार्डेकर व सचिन वराडकर यांच्या प्रचार रॅलीचा वेंगुर्ला-राजवाडा येथील श्री देव ब्राह्मण देवस्थान येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या रॅलीस नागरिकांचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पक्षाच्या या रॅली वेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव एम के गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, महिला तालुकाध्यक्षा ऋतुजा शेटकर, शहर अध्यक्ष सुरज परब, उमेदवार ॲड गोविंद गोपाळ उर्फ जी. जी. टाककर, ॲड मनीष सातार्डेकर, सचिन वराडकर तसेच जिल्हा सचिव सुशील चमणकर, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर , युवक अध्यक्ष, गजानन कुंभार, धैर्यशील टाककर, श्रेयस टाककर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग एक मध्ये ॲड मनीष सातार्डेकर, प्रभाग ७ मध्ये ॲड गोविंद गोपाळ उर्फ जी. जी. टाककर, तर प्रभाग ९ मध्ये सचिन वराडकर असे

उच्चशिक्षित तीन उमेदवार दिले आहेत. वेंगुर्ला शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असणार असून नागरिकांना अभिप्रेत असणारा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्य ते करणार असल्याचे यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव एम के गावडे यांनी रॅलीला संबोधित करताना सांगितले.