खरीप हंगामातील भात, नाचणी करिता केंद्रशासनाडून एक रुपयात विमा संरक्षण

 

मंडणगड | प्रतिनिधी : केंद्र शासनाकडून तालुक्यातील शेतकऱ्यां करिता केवळ एक रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे तालुक्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ खरीप हंगामासाठी घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुप्रिया घोडके यांनी केले आहे. कोकणातील खरीप हंगामातील भात व नाचणी या पिंकांकरिता केंद्र शासनाने एक रुपयात विमा संरक्षण देवू केले आहे. खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025 /26 या तीन वर्षाचे कालवधीकरिता ही योजना राबवण्यात येणार आहे. हंगामातील पीक विम्याचा लाभ घेण्याकरिता 31 जुलै 2023 ही अंतीम मुदत ठेवण्यात आहे. किंड रोग, प्रतिकुल परिस्थिती, नैसर्गीक आपत्ती आल्यास पिकांस विम्याचे संरक्षण मिळणार आहे. प्रतिकुल परिस्थितीत शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधीत राखणे व त्यांना नाविन्यपुर्ण आणि सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देण्यास शासन प्रयत्नशील आहे. पिकविमा हप्ता खरिप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्का तसेचे खरीप, रब्बी हंगाम व नगदी पिंकासाठी पाच टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. जोखमीबाबत हवामनातील घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसासन, पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळ होणार नुकसान, पिकाच्या हंगामापासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैर्सगिक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र गलमय होणे, मुस्खलन,दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादीमुळे पिकामध्ये हंगामाच्या शेवटी उत्पादनात मोठ्या प्रमाणात होणारी घट, स्थानीक नैर्सगीक कारणामुळे पिकाचे काढणीपश्चात होणार नुकसान महत्वाचे असणार आहे. अधिक माहीतीसाठी तालुका कृषी कार्यालय अथवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचे आलाहन कार्यालयाचेवतीने करण्यात आले आहे.