ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे कापईवाडी येथील रहिवासी रमेश न्हानू वरेकर वय वय 57 यांचे गोवा बांबूळी येथे दुःखद निधन झाले.महिन्याभरा पूर्वी ते आजारी होते त्यानंतर त्यांच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार करून घरी आणण्यात आले होते. गेले काही दिवस आजारपणातून बरे होत होते मात्र दोन दिवसापूर्वी त्यांची तब्बेत अचानक बिघडली व पुनः त्यांना बांबूळी येथे उपचार करण्यासाठी नेण्यात आले मात्र त्यांची तब्बेत खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग असणाऱ्या वरेकर यांचे यादव चारिटी ट्रस्ट सिंधुदुर्ग साठीही मोठे योगदान होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माजी माजी ग्रा. पं. सदस्य रंजना वरेकर यांचे पती,रामा व नागेश यांचे वडील तर प्रसिद्ध मूर्तिकार सुरेश वरेकर यांचे ते भाऊ होय त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे,एक मुलगी, भाऊ, वहिनी,सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.













