गुहागर नगरपंचायतसाठी 5 हजार 961 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

2 हजार 856 पुरुष तर 3 हजार 105 स्त्री मतदार

आशिष कारेकर | गुहागर :
गुहागर नगरपंचायत निवडणूकिसाठी येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून येथील मतदार देखील आपला निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी तयार आहेत.या निवडणुकीसाठी 17 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.नगराध्यक्ष निवडणूकीची लढत चौरंगी तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 40 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
गुहागर नगरपंचायत निवडणूकिमध्ये एकूणत 17 मतदान केंद्र असून 5 हजार 961 एकूण मतदार आहेत.यामध्ये 2 हजार 856 पुरुष तर 3 हजार 105 स्री मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकात्मिक बाल विकास योजना अंगणवाडी बाग या मतदान केंद्रात 264 पुरुष तर 259 स्री असे एकूण 523 मतदार,प्रभाग क्रमांक 2 मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. 2 खोली नं.1 या मतदान केंद्रात 193 पुरुष तर 210 स्री असे एकूण 403 मतदार,प्रभाग क्रमांक 3 मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. 2 खोली नं.2 या मतदान केंद्रात 188 पुरुष तर 194 स्री असे एकूण 382 मतदार,प्रभाग क्रमांक 4 मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. 2 खोली नं.1(नारायण मंदिर शेजारी) या मतदान केंद्रात 174 पुरुष तर 199 स्री असे एकूण 373 मतदार, प्रभाग क्रमांक 5 मध्ये जि. प. केंद्र शाळा गुहागर नं. 2 खोली नं.2(नारायण मंदिर शेजारी) या मतदान केंद्रात 152 पुरुष तर 157 स्री असे एकूण 309 मतदार, प्रभाग क्रमांक 6 मध्ये श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालय गुहागर या मतदान केंद्रात 150 पुरुष तर 151 स्री असे एकूण 301 मतदार, प्रभाग क्रमांक 7 मध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात 149 पुरुष तर 152 स्री असे एकूण 301 मतदार, प्रभाग क्रमांक 8 मध्ये श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात 164 पुरुष तर 138 स्री असे एकूण 302 मतदार, प्रभाग क्रमांक 9 मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात 192 पुरुष तर 223 स्री असे एकूण 415 मतदार, प्रभाग क्रमांक 10 मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात 139 पुरुष तर 171 असे एकूण 310 मतदार,प्रभाग क्रमांक 11 मध्ये ग. बा. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पार्वतीबाई गुरुपद ढेरे कला आणि महेश जनार्दन भोसले विज्ञान महाविद्यालय गुहागर या मतदान केंद्रात 171 पुरुष तर 186 स्री असे एकूण 357 मतदार, प्रभाग क्रमांक 12 मध्ये जीवन शिक्षण शाळा नं.1 या मतदान केंद्रात 135 पुरुष तर 122 स्री असे एकूण 257 मतदार, प्रभाग क्रमांक 13 मध्ये जीवन शिक्षण शाळा नं.1 या मतदान केंद्रात 123 पुरुष तर 175 स्री असे एकूण 298 मतदार, प्रभाग क्रमांक 14 मध्ये जीवन शिक्षण शाळा नं.1 या मतदान केंद्रात 151 पुरुष तर 205 स्री असे एकूण 356 मतदार, प्रभाग क्रमांक 15 मध्ये जि. प. प्राथमिक शाळा जांगळेवाडी गुहागर या मतदार केंद्रात 149 पुरुष तर 182 स्री असे एकूण 331 मतदार, प्रभाग क्रमांक 16 मध्ये जि. प. प्राथमिक शाळा जांगळेवाडी गुहागर या मतदार केंद्रात 200 पुरुष तर 211 स्री असे एकूण 411 मतदार, प्रभाग क्रमांक 17 मध्ये अंगणवाडी खोली गुहागर जांगळेवाडी या मतदान केंद्रात 162 पुरुष तर 170 स्री असे एकूण 332 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.