जानवळे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात 17 रोजी ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ कीर्तन सोहळा

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील जानवळे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात
श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ जानवळे वार्ड क्रमांक २ यांच्या विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष ह. भ.प. दत्ताराम महाराज जांभळे, खजिनदार ह.भ.प. प्रभाकर महाराज दळवी,सचिव ह.भ.प.अमोल महाराज वनगे व सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने अधिकमास निमित्ताने एक दिवसीय भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ कीर्तन सोहळा रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दिनांक १७ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ३ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी ९/१२ अध्याय पारायण सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० वा.सामुदायिक हरिपाठ होईल. सायंकाळी ७ ते ९ वा.हरि किर्तन होईल.व्यासपीठ चालक व किर्तनकार ह.भ.प. नारायण महाराज पवार चिपळूण ,कोकण रत्न पुरस्कार प्राप्त प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प‌. संतोष महाराज दळवी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष व सर्व ग्रामस्थ व मुंबईतील ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.जानवळे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर सन १९८४ साली बांधण्यात आले.त्या वेळी मंडळाचे व्यवस्थापन वैकुंठवासी ह.भ.प. कृष्णा बुवा जांभळे, वैकुंठवासी ह.भ.प‌. केशव बुवा दळवी, वैकुंठवासी ह.भ.प. रामचंद्र बुवा दळवी व इतर सहकारी यांच्या अथक परिश्रमाने हे मंदिर बांधले गेले. या मंदिराचा जीर्णोद्धार वैकुंठवासी गुरुवर्य ह.भ.प. आत्माराम महाराज सोलकर, चिखली यांनी केला.
गेली अनेक वर्षांची परंपरा या मंदिरात आहे अनेक पारमार्थिक कार्यक्रम नेहमी चालू असतात. होळी पोर्णिमा ते सप्तमी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो गावातील ग्रामस्थ अतिशय भक्तिभावाने सर्व कार्यक्रमात सहभागी होतात व सहकार्य करतात .तरी मंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी मिळून भरभरून सहकार्य करावे व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ जानवळे वार्ड क्रमांक २ यांच्यावतीने करण्यात आले आहे.