एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली मध्ये सहा दिवशीय एम्प्लॉयबिलिटी स्किल्स ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली मध्ये दिनांक 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या आठवड्या मध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व ॲपटेक सोल्युशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवशीय ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य व पात्रता परीक्षा यासंदर्भात या ट्रेनिंग मध्ये मार्गदर्शन करण्यात आले. ॲपटेक सोल्युशन कोल्हापूर या नामांकित कंपनी मार्फत शोएब अत्तार, संकेत साळुंखे, अरफान अल्टेकर व अफिफा पठाण यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट, वर्बल रीजनिंग, रेस्युमे बिल्डिंग, लिंकडीन प्रोफाइल बिल्डिंग या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन मिळावे यासाठी
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला . सदर ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कंप्यूटर इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग या शाखेच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सन 1999 पासून संस्थापक खासदार माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सौ नीलम ताई राणे उपाध्यक्ष आमदार डॉ. निलेश राणे, सचिव आमदार कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे अनेक उपक्रम राबवले जातात. प्राचार्य डॉ. डी एस बाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या ट्रेनिंग प्रोग्राम चा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पात्रता परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वास व्यक्त केला. सदर ट्रेनिंग प्रोग्राम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या सर्वांचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.