चाफेड गावठण येथील रस्त्याचे खडीकरण–डांबरीकरणाचे भूमिपूजन

शिरगांव (प्रतिनिधी)   देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथे मुख्य रस्ता ते प्राथमिक शाळा क्रमांक १ या रस्त्याच्या खडीकरण–डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संजय गांधी निराधार योजनेचे देवगड तालुकाध्यक्ष व भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद साटम आणि भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले. जनसुविधा योजनेअंतर्गत या कामासाठी सुमारे १० लाख रुपये निधी मंजूर असून अंदाजे २८५ मीटर लांबीचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण होणार आहे.

या कामासाठी सरपंच महेश राणे यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे लेखी प्रस्तावाद्वारे मागणी केली होती. तसेच आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात कै. किरण मेस्त्री यांनी या कामासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले होते. याशिवाय भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम, मिलिंद साटम, राजेंद्र शेट्ये यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

या प्रसंगी सरपंच महेश राणे, संजय गांधी निराधार योजना देवगड तालुकाध्यक्ष मिलिंद साटम, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र शेट्ये, संतोषकुमार फाटक, भाजपा शक्तीप्रमुख शैलेश जाधव, माजी सरपंच आकाश राणे, ग्रा. प. सदस्य सुनील कांडर, माजी सरपंच संतोष साळसकर, ठेकेदार सुरज चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सचिन मोंडकर, माजी सरपंच दीपाली घाडी, प्रदीप घाडी, अशोक घाडी, एकनाथ घाडी, उदय राणे, प्रफुल्ल राणे, संतोष घाडी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.