शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील जामगे गावात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मातोश्रींचे नाव लिलाबाई गंगाधर कदम असे होते. त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम व पर्यावरण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत. तसेच हॅथवे इंटरनेटचे सदानंद कदम आणि जिल्हा परिषद रत्नागिरी बांधकाम सभापती अरुण उर्फ चंद्रकांत कदम यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून, स्थानिकांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना व्यक्त केली आहे..