रत्नागिरी:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान2025 अंतर्गत धामणसे ग्रामपंचायत मार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी महा स्वच्छता रॅली श्रीदेव रत्नेश्वर मंदिर तें रेवाळे वाडी पर्यंत काढण्यात आली रॅली मध्ये सरपंच श्री अमर रहाटे, उपसरपंच सौं. ऋतुजा कुलकर्णी ग्रामपंचायत अधिकारी देविदास इंगळे, सदस्य सौं. वैष्णवी धनावडे, समीर सांबरे, सौं. अनघा जाधव, संजय गोणबरे शिक्षक श्री. गायकवाड सर, महेंद्र रसाळ, सौं. ढापरे मॅडम, कांबळे मॅडम, जाधव मॅडम, पाटील मॅडम, आरोग्य सहाय्यक श्री निवेडकर, ग्रामपंचायत महसूल अधिकारी श्रीम. सिद्धी शिवलकर, आरोग्य सेवक, कृषी सहाय्य्क मोहिरे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ विद्यार्थीआणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठयासंख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा सुधरूढा बालक स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री पंचायत राज अभियान बाबत जनजागृती साठी वार्डसभा तसेच वॉल पेंटिंग करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागातून चार बंधारे बांधण्यात आली. बचत गटाच्या उत्पादीत मालाचे दत्त जयंती उत्सवात विक्री प्रदर्शन भरविण्यात आले. अभियान काळात करांची वसुली 98% करण्यात आली. लोकसहभाग म्हणून ग्रामस्थांनी 210000/- इतकी लोक वर्गणी देऊन सहकार्य केले.गावा मध्ये ग्रामस्थांमार्फत नियमित स्वच्छता मोहोम राबविण्यात येत आहे.सदर अभियानात लोकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.
Home महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत धामणसे ग्रामपंचायत अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न












